लबाड कोल्हा.
एके दिवशी एका कोल्ह्याला एक कावळा झाडावर बसलेला दिसला. त्या कावळ्याच्या चोचीमध्ये एक पुरी होती. कोल्ह्याला ती पुरी खाण्याची खूप इच्छा झाली. मग तो विचार करू लागला, की ती पुरी कशी काय मिळवता येईल.
मग त्याने एक युक्ती केली. तो कावळ्या जवळ आला आणि कावळ्याला म्हणाला, "कावळे दादा, कावळे दादा तुझा आवाज खूप छान आहे. मला एक गाणं म्हणून दाखव." हे ऐकताच कावळ्याला खरेच वाटले, आपला आवाज खूप छान आहे. म्हणून मग त्याने गाणं म्हणण्यासाठी चोच उघडली, तशी ती पुरी खाली पडली.
ती पुरी घेऊन कोल्हा पळून गेला. तेव्हा कावळ्याच्या लक्षात आले की, ती पुरी मिळवण्यासाठी लबाड कोल्हा आपल्याला गोड बोलत होता. कोल्ह्यान आपल्याला फसवले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
, nice
ReplyDeleteचैताली शेखर चव्हाण छान आहे गोष्ट
ReplyDeletePost a Comment