दुष्ट नाग
एका जंगलात एक तळे होते.तळ्याकाठी एक मोठे आंब्याचे झाड होते.झाडावर पक्षांनी घरटी बनवलेली होती.त्यामध्ये पक्ष्यांची पिल्ले व अंडी होती.त्याच झाडाखाली एक मोठे वारूळ होते.त्या वारुळात एक दुष्ट नाग राहत होता.
पक्षी अन्नाच्या शोधात बाहेर गेले की, तो नाग झाडावर चढत व घरट्यातील लहान पिल्ले व अंडी खात असत. सर्व पक्षी त्या दुष्ट नागाला वैतागून गेले होते. एक दिवस त्या तळ्यावर एक राजकुमारी आंघोळीसाठी आली. आंघोळी अगोदर तिने आपल्या गळ्यातील मौल्यवान हार बाजूला काढून ठेवला. कावळ्याने ते पाहिले. कावळ्याच्या डोक्यात एक युक्ती आली. कावळा पटकन गेला व त्यांने तो हार आपल्या चोचीत उचलला. कावळ्याने तो हार वारूळामध्ये टाकला. राजकुमारीने आरडाओरडा करताच शिपाई त्या वारुळाच्या दिशेने धावत गेले. हार मिळविण्यासाठी शिपायांनी पूर्ण वारुळच उद्ध्वस्त केले. वारुळा मध्ये तो दुष्ट नाग होता. शिपायांनी त्या नागाला ठार मारले आणि राजकुमारीचा हार राजकुमारीला परत केला. अशाप्रकारे, हुशारीने कावळ्याने त्या दुष्ट नागाला ठार केले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment