चिमणीने पुस्तक वाचले
शाळेची घंटा वाजली.मुले आनंदाने ओरडतच वर्गाबाहेर पळाले.कोणी ओसरीवर तर कोणी ओट्यावर, कोणी झाडाखाली जेवणासाठी बसले. मुले एकमेकांबरोबर गप्पागोष्टी करत मजेत जेवण करत होते. एका मुलाच्या हातात मात्र पुस्तक होते. त्या पुस्तकावर त्यांने आपल्या डब्यातील भजी ठेवले. पुस्तक वाचत वाचत तो ते खाऊ लागला. मुलांचे जेवण उरकले होते. मुले धावतच खेळायला पळाली. मुलाच्या हातातील पुस्तक तेथेच राहून गेले. थोड्याच वेळात तेथे चिमण्या जमा झाल्या. मुलांचे पडलेले खरकटे आपल्या चोचीने टिपू लागल्या. तेवढ्यात काही चिमण्यांना ते पुस्तक दिसले.
चिव चिव करत त्या सर्व त्या पुस्तकाभोवती जमा झाल्या. तेलकट झालेले पुस्तकाचे पान चिमण्या वाचू लागल्या. एक चिमणी म्हणाली, "हे पुस्तक कोणाचे असेल?"दुसरी म्हणाली, "शाळेतील त्या मुलाचे असेल, जो मुलगा अस्वच्छ राहतो.ज्याला ज्ञानाची किंमत नाही.ज्याने या पुस्तकावर भजी ठेवून खाल्ली आहे."तेवढ्यातच मळकटलेले कपडे घातलेला एक मुलगा धावतच परत आला.त्याने चिमण्यांना दगड मारले. चिमण्या पटकन उडून झाडावर जाऊन बसल्या. मुलाने ते पुस्तक उचलले, झटकले आणि पुन्हा वर्गाकडे धावू लागला. चिमण्यांनी पुस्तक बरोबर वाचले होते. पुस्तक कोणाचे आहे हे त्यांनी ओळखले होते.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment