छत्रपती संभाजीराजे
१४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर प्रतिसूर्य, महापराक्रमी छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म झाला. संभाजीराजे दोन वर्षाचे असताना माता सईबाई सर्वांना सोडून गेल्या.
कापूरहोळ गावची धाराऊ संभाजीराजांची दूधआई बनली. संभाजी राजांचे पूर्ण जीवन खडतर संकटे आणि आव्हानांनी भरलेले होते. जिजाबाईंनी संभाजीराजांना युद्धकलेचे, राजनीतीचे बाळकडू पाजले होते. संभाजी राजे कर्तव्यदक्ष, चारित्र्यसंपन्न, न्यायी ,प्रजाहित दक्ष आणि महान साहित्यिक होते. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे नखशिखा, नायिकाभेद, सातसतक हे ग्रंथ लिहिले.शृंगारपूरचे पिलाजी शिर्के यांची कन्या येसूबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. संभाजीराजे नऊ वर्षांचे असताना पुरंदरच्या तहातील अटीनुसार आग्रा येथे औरंगजेब बादशहाच्या भेटीस छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर गेले. मृत्यूच्या जबड्यात राजांबरोबर छावा चालला होता. हा एक राजकीय पाठ होता. तसेच नजर कैदेतून सुटणे हा दुसरा पाठ, संभाजीराजे बालवयात असतानाच शिकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर नऊ वर्ष वाऱ्यासारखे धावत, झुंजत त्यांनी स्वराज्य अबाधित राखले होते. त्यांचा एक एक गड घेताना औरंगजेब बादशहाची दमछाक झाली. मात्र तो काळा दिवस उगवला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी संभाजी राजे फितुरीमुळे मुकरबखान व दिलेरखान यांच्याकडून पकडले गेले. संभाजी राजांना पकडून बहादूरगडावर नेण्यात आले. रौद्ररूप संभाजी राजांना पाहण्यासाठी स्वतः औरंगजेब बहादूरगडावर आला. संभाजी राजांचे तेजस्वी रूप पाहून तोही शंभूराजांच्या पुढे क्षणभर झुकला. आज तो दुर्दैवी दिवस होता .फाल्गुन अमावस्याच्या दिवशी छत्रपती शंभूराजांना मारण्यात आले. बहादूरगडाने संभाजीराजांवर होणारे अनन्वित अत्याचार पाहिले होते. तो काळा दिवस हाच होता. स्वराज्यासाठी जगले आणि स्वराज्यासाठीच मेले, ते आमचे छत्रपती संभाजीराजे होते.
देश धरमपर मिटनेवाला शेरशिवा का छावा था।
महापराक्रमी, परमप्रतापी एक ही शंभूराजा था ।
जय जिजाऊ, जय शिवराय।।
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment