एक भारतीय संशोधक
शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता.एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले.तेव्हा दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली.शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही.वडिलांनीही आरोप केला, 'वाटे तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली.'शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली.खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले.हा शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला.इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती.ही स्पर्धा वजन मापक यंत्राबद्दल होती.एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ किंवा इतर वस्तु यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती.
यंत्र शोधून काढणाऱ्यास बक्षीस होते. भिसे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला आणि काय आश्चर्य! भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला. त्यांना बक्षीस मिळाले. या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्र शास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. भिसे इंग्लडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना केली. स्वयंचलित तोफा तयार करण्याचे त्यांनी नम्रतापूर्वक नाकारले व मानवतेच्या भूमिकेतून होणारा संहार आपल्या परीने वाचवला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment