सूर्याचे गर्व हरण
सूर्य हा प्रखर तेजस्वी, सर्वशक्तीमान. विश्वातील जीवसृष्टी ही सूर्यामुळे जिवंत आहे. सूर्य सर्वांना प्रकाश देतो. अंधकार दूर करतो. एक दिवस या सूर्याला गर्व झाला. त्याला वाटू लागले या विश्वाला जो प्रकाश मिळतो तो फक्त माझ्यामुळेच. माझ्यामुळे हे विश्व प्रकाशित आहे. मी नसेल तर सर्वत्र अंधकार पसरेल आणि या गर्वाने तो मोठ्यामोठ्याने ओरडू लागला. आहे का कोणी? या विश्वाला अंधारातून मुक्त करणारा. आकाशातील तारे, चंद्र हे ऐकून निशब्द झाले. त्यांना माहीत होते, आपला प्रकाश विश्वाला पुरेसा नाही. सूर्य हाच खरा शक्तिशाली आहे. सर्व शांत बसले. हे पाहून एक चिमुकला तारा धिटाईने पुढे आला. सर्वांना आश्चर्य वाटले.
तारा बोलू लागला, मला माहित आहे सूर्यच सर्व विश्वाला प्रकाश देतो, पण मला हे पण माहीत आहे, माझा प्रकाश थोडासा आहे पण प्रकाशाने अंधकार नेहमीच नाहीसा केला जातो. त्या तार्याचे बोलणे ऐकून इतर सर्वांना धीर आला. ते सर्व धिटाईने पुढे आले. बघता बघता आकाश चंद्र, चांदण्यांनी भरून गेले.पृथ्वीवर शितल प्रकाश पडला. पृथ्वी प्रकाशाने निश्चित नाहुन निघाली. मुलांनो लक्षात ठेवा प्रकाशने अंधकार नेहमीच भेदला जातो.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment