बुड बुड घागरी
मांजर माकड आणि उंदीर हे छान मित्र होते. एकदा त्यांनी ठरवलं की आपण खीर करायची. त्यासाठी साहित्य कोण कोण आणणार. मांजर म्हणाली," मी दुध घेऊन येते." माकड म्हणालं," मी पातेलं घेऊन येतो." उंदीर म्हणाला," मी साखर आणि रवा घेऊन येतो."
ठरल्याप्रमाणे सर्व जण साहित्य घेऊन आले. आणि खीर बनवण्याचा बेत सुरु झाला. छान पैकी चूल पेटवली चुलीवर पातेल ठेवलं, त्यात सगळं साहित्य टाकून मस्त खीर तयार केली.माकड आणि उंदीर खीर तयार होईपर्यंत खेळायला गेले होते. मांजरीने खीर कशी झाली हे पाहण्यासाठी थोडी खीर चाखून पाहिली. मांजरीला खीर खूपच आवडली. त्यामुळे तिने थोडी थोडी अशी करून सगळीच खीर संपवून टाकली आणि पातेल झाकून ठेवून पुन्हा झोपी गेली. माकड आणि उंदीर खेळून आले पाहतात तर काय? पातेले रिकामे!! त्यांनी मांजरीला उठवलं. तर मांजर देखील म्हणाली,"मला नाही माहिती खीर कोणी खाल्ली? मी तर झोपी गेले होते." मांजर काही कबूल करेना. यावर माकडाने एक युक्ती शोधली. माकडाने एक घागर आणली. आणि तिघेजण नदीवर गेले. माकड म्हणाले या घागरीवर एकेक करून बसायचे व म्हणायचे 'मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'
पहिल्यांदा माकड घागरीवर बसले म्हणाले," मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी." घागर बुडाली नाही. नंतर उंदीर घागरीवर बसला म्हणाला," मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी." पण घागर काही बुडाली नाही. आता मांजरीची वेळ आली होती. मांजर घागरीवर बसली व म्हणाली ,"मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी." आणि काय गंमत घागर खरच बूडू लागली. मग मांजर खूप घाबरली,रडू लागली.व म्हणाली,"मला क्षमा करा, मी खीर खाल्ली आहे, पण मी अशी चूक पुन्हा कधी करणार नाही, माझा जीव वाचवा." हे ऐकून माकडाने व उंदराने तिला माफ केले व तिचा जिव वाचवला. पण मांजरीला मात्र चांगलीच अद्दल घडली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Sujay Santosh Lokhande
ReplyDeletePost a Comment