चिटकू उंदीर
चिटकू उंदीर विचारात पडला. भुकेने पोटात खड्डा पडला. बिस्किटांचा मस्त वास सुटला. जेवणाचा बेत खास जमला. उडी मारुन टेबलावर चढला. भरभर बिस्किट खाऊ लागला. त्यात कुठेतरी खट्ट झाले. छोट्या चिटकु घाबरून गेला. चिटकूने धाव घेतली. आईला कडकडून मिठीत मारली. आईने चिटकुला समजावले. दोन दिवस डांबून ठेवले. तिसऱ्या दिवशी चिटकू म्हणाला, 'जातो ना गं थोडे फिरायला. आई म्हणाली, जरा जपून. मांजर आणली सगळ्यांनी मिळून. एकदा आई कामाला गेली. चिटकूची घालमेल सुरू झाली. काय झालेअसेल? कुठे गेली असेल? चिटकू आईला शोधायला लागला. चुकून मांजरीच्या पुढ्यातच आला. अरे बापरे! आता करू तरी काय? मांजर मला खाते की काय? धडामधूम आवाज झाला. वरचा डब्बा खाली आला. लाल-पिवळे ढग उसळले. मांजरीच्या डोळ्यात तिखट गेले. खोकली, शिंकली, रडू लागली. सैरावैरा पळू लागली. चिटकुला वाटले सुटलो बुवा. बिघडली होती फारच हवा.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment