मधमाशीने केली कमाल
एक होता शेतकरी होता. तो शेतात खूप कष्ट करायचा. त्याने शेतामध्ये सूर्यफुले लावली होती. सूर्यफुले- पिवळीधमक, टपोरी आणि टवटवीत होती.
मुंगीला फुले खूप आवडली. मुंगीने शेतकऱ्याकडून एक फुल घेतले. घरी आली. फुलातल्या बिया काढल्या. काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताई ला दिल्या. काही चिमणीला, तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या. काही बिया स्वतः घेतल्या. त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. कोकिळेने आपल्या वाट्याच्या बिया कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या. कावळ्याने बिया पाहिल्या.तो म्हणाला, "
"का ग बाई असं करतेस?
अंड्या बरोबर बियाही ठेवतेस?
नको माझ्या घरट्यात बिया
सगळ्या बिया जातील वाया."
कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या. चिमणी बसली बिया सोलायला. सोलता सोलता कंटाळा आला. 'काय बाई त्रास' म्हणत निघून गेली खेळायला. खारुताई होती खूप चपळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली. प्रत्येक बी लपवून ठेवली. मधमाशी होती मोठी चतुर. काम करण्यास नेहमीच आतुर. बिया पाहून विचारात गढली.
'करावे काय बियांचे?
भले व्हावे सर्वांचे.
उपाय काही सुचेना,
झोप काही लागेना. '
सकाळ होताच चटकन उठली. बिया घेऊन जमिनीवर आली. आनंदाने गाऊ लागली-" या रे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. "
कावळा म्हणाला, "कशासाठी कशासाठी" मधमाशी म्हणाली, "बिया रुजत घालण्यासाठी. यावर कोकिळा म्हणाली,
मला नाही वेळ.
कामाचा माझा कधी बसायचं मेळ.
कोकिळा गेली उडून, चिमणी राहिली झोपून. कावळा म्हणाला,
"माझ्याच्याने होणार नाही.
काम करून दमलोय बाई."
खारुताई आली सरसर
गेली डोळे फिरवित भरभर.
मधमाशीने बिया रूजत घातल्या.
पावसाळा आला. पाऊस पडला. बिया रुजल्या. रोपटी भरभर वाढू लागली. त्याला पिवळी फुले आली. फुले वाऱ्यावर डोलू लागली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली.
"रुजत घातल्या बिया चार,
त्याला आली फुले फार.
कामाची धरा रे कास,
तरच मिळेल पोटाला घास."
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment