वाटाणा, फुटाणा.....
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा!
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेजण!
तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर!
"तिळा तिळा कसली रे गडबड?"
"थांबायला वेळ नाही.
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड!"
"एेक तर जरा, पहा तर खरा,
कणभर तिळचा मणभर नखरा!"
"बघा तरी थाट! सोडा माझी वाट!"
बघू या गंमत, करूया जमंत!
चला रे जाऊ याच्या बरोबर.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
चैताली शेखर चव्हाण छान आहे गोष्ट
ReplyDeletePost a Comment