शहाण्या शेळ्या
एका ओढ्यावर एक छोटा परंतु अरुंद पूल होता.त्या पुलावरून एका वेळेस एकच व्यक्ती किंवा प्राणी जाऊ शकत. एक दिवस त्या अरुंद पुलावर दोन शेळ्या समोरा समोर आल्या.त्या दोघींमध्ये भांडण सुरू झाले.मी अगोदर जाणार म्हणून त्या दोघी जोरात जोरात भांडू लागल्या.
भांडता भांडता दोन्ही शेळ्यांचा तोल गेला आणि त्या ओढ्यामध्ये पडल्या.काही दिवसानंतर असेच एकदा दोन शेळ्या त्या पुलावर समोरा समोर आल्या.
त्या दोघी समजदार होत्या. त्यातील एक शेळी खाली बसली व दुसरी शेळी तिच्या पाठीवरून पलीकडे गेली. नंतर बसलेली शेळी आपल्या मार्गाने पुढे गेली. अशाप्रकारे समजदारपणाने त्या दोघींनी तो अरुंद पूल पार केला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment