शिका व संघटित व्हा!
सर्वांना समान न्याय,समता, बंधुत्व या विचारांची प्रेरणा देऊन, देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात साजरी करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीति तज्ञ, समाज सुधारक ,वकील ,दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन महामानव संबोधले जाते. 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धीमत्ता समाजासाठी असीम त्याग करणारे ,महाडचा सत्याग्रह, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार ,स्वतंत्र मजूर पक्ष ,बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना ,दलित शिक्षण संस्थेची स्थापना अशा कितीतरी गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र दिला .असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment