धूळपेरणी
पाऊस पडेल, या आशेने शेतकरी पेरणी करतात. त्याला धूळपेरणी म्हणतात. पाऊस लवकर पडेल, अशी त्यांना आशा असते. पाऊस उशिरा पडला किंवा फारच कमी पडला, तर पेरलेले बी वाया जाते. दुबार पेरणी करावी लागते. हा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही आणि दुबार पेरणीचे पीकही पहिल्या सारखे चांगले येत नाही. कधी पाऊस खूप पडतो तर कधी पडतच नाही. उगवलेले पीक वाया जाते. शेतातील पिकांवर अनेक वेळा रोग पडतो. कडाक्याची थंडी पडून देखील पीक वाया जाते. आणि शेतकरी अडचणीत सापडतात.
धान्य पिकवण्यामागे शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात ते आपल्याला माहित आहे. ऊन, पाऊस, कडक थंडी, दिवस, रात्र शेतकरी शेतात कष्ट करत असतात.
'आपण धान्य सहज विकत घेऊ शकतो.असे आपल्याला वाटते; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पाण्याअभावी धान्य पिकले नाही, तर कितीही पैसा असूनही त्याचा उपयोग नाही. आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. त्यासाठी गरजे एवढेच अण्ण शिजवणे, जेवताना हवे तेवढेच अन्न ताटात घेणे, ताटात अन्न न टाकणे या प्रकारे आपण अन्नधान्याची जपणूक केली पाहिजे.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment