पश्चाताप
दिवस मावळतीला आला.राधाने शेतातील कामे उरकली. घाईघाईने राधा घराकडे निघाली. रस्त्याने चालत असताना तिला एक छोटे मुंगसाचे पिल्लू दिसले. आसपास पहिले तर त्या पिल्लाची आई कुठेही दिसेना. राधा त्या पिल्लाच्या जवळ गेली. हलकेच त्याला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि ती घरी आली. तिने त्याला जीव लावला. खाऊ- पिऊ घातले. आपल्या मुलाप्रमाणे त्यालाही सांभाळले. पिल्लू हळूहळू मोठे होऊ लागले. एक दिवस राधाने आपल्या बाळाला झोळी मध्ये टाकले. मुंगसाच्या पिल्लाला दारात बसवून तिने बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितले.
ती पाणी आणण्यासाठी गेली. बाळ झोळीत शांत झोपले होते. तेवढ्यात एक साप बाळाच्या दिशेने आला. मुंगसाने ते पाहिले. त्याने पटकन त्या सापावर झडप मारली. सापाचे तुकडे केले. मुंगसाचे तोंड रक्ताने भरले होते. ते पुन्हा येऊन दारात बसले. राधाने नदीवर पाण्याचा हंडा भरला आणि घराकडे निघाली. तेवढ्यात एक बाई राधाला म्हणाली, "काही केले तरी ते मुंगूस आआहे! त्याचा काय भरवसा. त्याला कशाला घरात ठेवले. राधाने ऐकून न ऐकल्यासारखे केले व घराकडे निघाली. घराच्या दारात येताच तिला मुंगसाचे तोंड रक्ताने भरलेले दिसले. तिला वाटले मुंगसाने आपल्या बाळाला मारून खाल्ले. तिने डोक्यावरचा हंडा मुंगसाच्या अंगावर टाकला. मुंगूस जागेवरच मेले. धावत पळत झोळीकडे पळाली. पाहते तर बाळ शांत झोपले होते. जवळच सापाचे तुकडे पडले होते. राधा समजून गेली, मुंगसाने आपल्या बाळाचा जीव वाचवला. मात्र, तिला आता पश्चाताप होऊ लागला होता.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment