आंब्याच्या झाडाखाली
आंब्याच्या झाडाखाली जाऊ चला,
गार गार वा-यात खेळू चला.
गार गार गार गार येईल वारा,
पडतील आंबे पटापटा.
पडलेले आंबे वेचू चला.
गार गार वा-यात खेळू चला.
आंब्याच्या झाडाखाली जाऊ चला,
गार गार वा-यात खेळू चला.
कै-या घेऊन लोणचे करू .
गुळ घालून गुळंबा करू.
चपातीला लावून खाऊ चला,
गार गार वा-यात खेळू चला.
आंब्याच्या झाडाखाली जाऊ चला,
गार गार वा-यात खेळू चला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment