सर अल्बर्ट आईन्स्टाईन
गणिताकडे लक्ष नसतं म्हणून एका शिक्षकाने एका मुलाची फार निर्भत्सना केली.साधी साधी गणिते सुद्धा तुला सोडविता येत नाहीत, म्हणजे आयुष्यात तू काहीच करू शकणार नाहीस.असं भाकीत केलं.त्याच्या आईला मात्र मुलाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता.त्यांनी स्वतः त्याला गणित शिकवलं.पुढे हाच मुलगा प्रख्यात गणितज्ञ झाला.त्यांनी जगाला सर्वात महत्त्वाचं वस्तुमान आणि ऊर्जा यांच्या समीकरणाची सूत्र दिले.याशिवाय त्यांनी 300 पेक्षा जास्त वैज्ञानिक संशोधन पत्रे प्रकाशित केली. माशाची परीक्षा पाण्यात नघेता झाडावर चढण्यात किंवा पळण्यात घेत असाल तर त्यासारखे दुर्दैव नाही असे त्यांचे मत होते.तसेच त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना सर्वोच्च सन्मान नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे अपयश आले होते. तरीसुद्धा ते कधीच खचले नाही. उलट ते निरंतर प्रयत्न करत राहिले आणि यशस्वी होऊन लोकांसाठी ते प्रेरणादायी बनले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment