आभाळ पडलं पळा पळा
एक छोटस कोंबडीचे पिल्लू झाडाखाली दाणे टिपत होते. पिल्लू होत छान, पण खूप भित्र. झाडाचे एक पान त्याच्या अंगावर पडलं. त्याला वाटलं आभाळाचा तुकडा अंगावर पडला. पिल्लू घाबरलं आणि पळत सुटल. आभाळ पडलं पळा पळा म्हणत पळू लागले. त्याला रस्त्यात कोंबडी भेटली.
तिने विचारले, "का रे, का पळतोस? पिल्लू म्हणाले, "माझ्या अंगावर आत्ताच आभाळाचा तुकडा पडला आहे. हे ऐकून कोंबडीही पिल्लाच्या मागे पळू लागली. तेवढ्यात त्यांना एक बदक भेटले. बदकाने विचारले ,तुम्ही का पळत आहे. तेव्हा कोंबडी म्हणाली, "या पिल्लांच्या अंगावर आभाळाचा तुकडा पडला आहे. " आपला जीव वाचवा. पळा पळा.
तिघेही आभाळ पडलय पळा पळा म्हणत पळत सुटले. तेवढ्यात त्यांना एक कुत्रा भेटला. कुत्र्याने विचारले तुम्ही का पळत आहे. तेव्हा कोंबडीने व बदकाने सांगितले, या पिल्लांच्या अंगावर आभाळाचा तुकडा पडला आहे. आपला जीव वाचवा, पळा पळा. कुत्रा म्हणाला, "वर बघा. आभाळ तर जागेवरच आहे." हे पिल्लू आहे भित्र. त्याच्या अंगावर झाडाचे पान पडले. त्याला वाटलं आभाळच पडलय. सर्वजण हसू लागले व माघारी फिरले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment