पिल्लाची डरकाळी
एक घनदाट जंगल असते. जंगलामध्ये वाघ आणि त्याचे पिल्लू एका गुहेत राहत असतात. बरेच दिवस होतात पण पिल्लू काही बोलत नाही.
पिल्लाचा आवाज येत नाही. पिल्लाला बोलता यावे म्हणून वाघ मांजराची नेमणूक करतो. मांजर म्याऊ म्याऊ शिकवण्याचा प्रयत्न करते. वाघोबा वैतागतो आणि त्या मांजरला हाकलून देतो. नंतर गाढवदादा येतात. खिंकाळायला सुरुवात करतात. पुन्हा वाघोबाचा वैताग वाढतो.
पिल्लू हैरान होते. पिल्लाला बोलायला कसे शिकवावे हे काही समजत नाही. एक दिवस पिल्लू जंगलात फिरत असते. दबा धरून बसलेला शिकारी पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो. पिल्लू त्या शिकारीला पाहतो आणि जोराची डरकाळी ठोकतो. पिल्लाची डरकाळी ऐकून शिकाऱ्याच्या हातातील बंदूक खाली पडते.
शिकारी धूम ठोकतो. पिल्लाची डरकाळी ऐकून वाघोबा मात्र खुश होतो. पिल्लू बोलू लागले म्हणून सगळेच खुश होतात.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment