सोनेरी मासा
रामू आपल्या बायको बरोबर एका छोट्या झोपडीत राहत होता. रामूची बायको खूप स्वार्थी स्वभावाची होती. रामू दिवसभर समुद्रावर जायचा. मासे पकडायचा. ते विकून घर चालवायचा. एक दिवस असाच रामू मासे पकडण्यासाठी गेला. त्याच्या जाळ्यामध्ये एक सोनेरी मासा सापडला.
आश्चर्य म्हणजे तो मासा बोलू लागला. हे दयाळू माणसा ! मला सोडून दे. माझा जीव वाचव. रामूला त्याची दया आली. रामूने त्याला सोडून दिले. मासा उड्या मारत निघून गेला. जाताजाता रामूला म्हणाला, "मला कधी पण आवाज दे ,मी लगेच येईल. रामू मोकळ्या हातानेच घरी परतला. समुद्रावर घडलेली सर्व हकीकत त्याने आपल्या बायकोला सांगितली. रामूची बायको म्हणाली, "आत्ताच्या आत्ता तुम्ही समुद्रावर जा.माशाला आवाज द्या, आणि त्याला आपल्यासाठी मोठे घर मागा. रामू नाविलाजाने समुद्रावर गेला. त्याने मोठ्याने माशाला आवाज दिला, आणि काय आश्चर्य? मासा रामूच्या जवळ आला. रामू माशाला म्हणाला, "माझ्या बायकोने सांगितलं आहे, आम्हाला मोठं घर दे. मासा म्हणाला, "ठीक आहे. जा घरी. रामू परतला. त्याच्या छोट्या झोपडी ऐवजी त्या ठिकाणी मोठे घर होते. रामूला पाहताच बायकोला खूप आनंद झाला. ती रामूला म्हणाली, "आत्ता समुद्रावर जा, आणि माझ्यासाठी खूप दागिने मागा. रामू पुन्हा समुद्रावर गेला, आणि माशाला आवाज दिला. मासा लगेच आला. मासा म्हणाला, "आता काय पाहिजे तुला? " रामू म्हणाला, "माझ्या बायकोला खूप दागिने हवे आहेत. " मासा म्हणाला, "ठीक आहे. जा. " रामू घरी परतला, तर त्याच्या बायकोच्या अंगावर खूप दागिने होते. ती वेड्यासारखी नाचत होती. नाचता नाचता ती थांबली आणि रामूला म्हणाली, "आत्ताच्या आत्ता समुद्रावर जा आणि माशाला म्हणा, माझ्या बायकोला देवी बनव. आणि देवासारखे देवत्व दे. रामूला बायकोचे हे मागणे पटले नाही. तरी तो समुद्रावर गेला. समुद्र खवळलेला होता. वारा वाहत होता. रामूने माशाला आवाज दिला. मासा लगेच आला व म्हणाला, "आता काय पाहिजे तुला?" रामूने आपल्या बायकोची मागणी माशाला सांगितली. त्या स्वार्थी बायकोची मागणी ऐकून मासा रागवला, व रामूला म्हणाला, "आत्ताच्या आत्ता माघारी जा आणि पुन्हा मला तुझे तोंड दाखवू नकोस." रामू निराश मनाने माघारी गेला. पाहतो तर काय? त्याच्या मोठ्या घरात ऐवजी त्या ठिकाणी पहिली झोपडी होती. बायको दारात बसून रडत होती. तिच्या स्वार्थी मागणीमुळे मिळालेले सर्व गेले होते.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment