जन-गण-मन
मुलांनो रोज आपण आपल्या शाळेमध्ये जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणतो. पण ,तुम्हाला माहित आहे का? ते कोणी लिहिले आहे? 'जनगणमन' हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले आहे. त्यांनी बंगालमध्ये बोलपुर येथे एक शाळा सुरू केली.
हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, किलबिलणारे पक्षी, निळे आकाश अशा परिसरात ही शाळा भरायची. या शाळेचे नाव 'शांती-निकेतन'.मुलांना ती शाळा फार आवडायची. तेथील वातावरण कसे शांत! गडबड, गोंधळ नाही. मोटारींचा आवाज नाही. गाड्यांचा खडखडाट नाही. अशी ही शाळा झाडाखाली भरायची.
या शाळेत गायला, नाचायला शिकवायचे. हस्तकला व हस्तव्यवसाय शिकवायचे. मुले स्वतः नाटके बसवायची. गाणी गायची. नाचायची आणि त्याबरोबर नवे नवे विषय ही शिकायची. या शाळेत बाहेरच्या देशातूनही मुले शिकायला यायची. टागोरांना 1913 मध्ये नोबल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकाची रक्कम त्यांनी आपल्या शाळेला दिली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment