मूर्ख बोकड
एका जंगलामध्ये एक विहीर होती. ती सहजासहजी दिसून येत नसे. चालता चालता एके दिवशी एक कोल्हा त्या विहिरी मध्ये पडला आणि मदतीसाठी हाका मारू लागला. त्या विहिरी मध्ये पाणी जास्त नव्हते त्यामुळे तो बुडला नाही. परंतु त्याला वर येता येईना. त्यामुळे तो मदतीसाठी इतरांना हाका मारू लागला. 'वाचवा वाचवा मला कोणीतरी बाहेर काढा'. परंतु खूप वेळ झाले तिथे कोणीच फिरकले नाही.
खूप खूप उशिरा नंतर एक बोकड तेथून चालले होते. त्याने त्या विहिरीमध्ये सहज डोकावून पाहिले तर त्याला आतमध्ये कोल्हा दिसला. बोकडाने कोल्ह्याला विचारले ,"कोल्हे दादा तू काय करतो आहेस विहिरीमध्ये?"
कोल्ह्याला एक युक्ती सुचली त्याने बोकडाला खरे न सांगता खोटे सांगितले. म्हणाला, "अरे या विहिरीतील पाणी खूप गोड आहे. तुला प्यायचे का या विहिरीचे पाणी? मी तर खूप वेळ झाले हे पाणी पीत आहे. ये तू पण हे पाणी प्यायला."
हे ऐकून मूर्ख बोकडाला समजले नाही ,की हा कोल्ह्याचा कावा आहे. त्यामुळे त्या बोकडाने विहिरीमध्ये उडी मारली. बोकडाने विहिरीमध्ये उडी मारता क्षणीच कोल्हा त्याच्या पाठीवर चढून वरती निघून गेला आणि आणि बोकडाला म्हणाला,"मूर्ख बोकडा बस आता तू एकटाच पाणी पीत." अशाप्रकारे बोकडाची मदत न करता उलट त्याला संकटात टाकून कोल्हा निघून गेला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment