अविचारी खेकडे
एका तळ्यात मासे आणि खेकडे राहत होते.त्या तळ्याकाठी दोन दुष्ट बगळे येत असत. तळ्यातील मासे खाण्यासाठी ते रोज टपून बसे. तळ्याला पाणी भरपूर होते. त्यामुळे त्यांना रोज एक किंवा दोनच मासे मिळत. हळूहळू हिवाळा संपला, ऊन तापू लागले. तसे तळ्याचे पाणी आटू लागले. बगळ्यांना अधिक मासे सापडू लागले. बघता-बघता तळ्याचे पाणी खूप आटले. बगळयांनी तळ्यातील सगळे मासे संपवून टाकले. बगळ्यांचे लक्ष आता खेकड्याकडे गेले. खेकडे मात्र कड्या- कपारीत लपून बसत. त्यामुळे ते बगळ्याला सापडत नसे.बगळ्यांनी युक्ती केली. त्यांनी खेकड्यांना गोड गोड बोलायला सुरुवात केली.
बगळे खेकड्यांच्या पिल्लांना म्हणाले, "बाळांनो, इथले पाणी तर आटले आहे. शेजारी जवळ एक मोठे तळे आहे. तिकडे चला, तुम्हाला खूप मजा वाटेल."खेकड्यांच्या पिल्लांना हे खरे वाटले. गोड बोलणाऱ्या बगळ्या बरोबर ते दुसऱ्या तळ्यात जाण्यास तयार झाले. पण जाणार कसे? बगळ्यानी एक युक्ती केली. दोघांनी पायामध्ये काठी धरली. खेकड्याला सांगितले तू काठीला पकड. बगळे उडू लागले.पुढे आल्यावर पिल्लांनी खाली पाहिले, तर त्याला कुठेही पाणी दिसेना. बगळ्यांनी पायातील काठी सोडून दिली. खेकडे खाली खडकावर आपटले. मग बगळ्यांनी मेलेल्या खेकड्यावर ताव मारला. अंधपणे ठेवलेला विश्वास हा नेहमीच आपल्या जिवावर बेततो.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment