अती उतावळेपणा
एकदा रानामध्ये एका गारुड्याला एक साप दिसला. त्याने तो साप पकडला. गारुडी तो साप आपल्या घरी घेऊन आला. गारुड्याने तो साप त्याच्या एका टोपलीमध्ये ठेवला आणि टोपलीचे झाकण बंद करुन घेतले.
त्याच घरामध्ये एक पिटूकला उंदीर राहत होता. गारुड्याने घरामध्ये बंद करून ठेवलेली ती टोपली उंदराने पाहिली होती. त्या उंदराला वाटले की या टोपलीमध्ये नक्की काहीतरी मिठाई ठेवलेली असेल,
म्हणून तो उंदीर त्या टोपलीचे झाकण काढू लागला. खूप प्रयत्न केले तरी देखील त्याला ते झाकण काही निघेना. शेवटी उंदराला काही दम निघेना त्याला असे वाटले की आपण आपल्या टोकदार दातांनी ही टोपली कुरतडून काढू शकतो;म्हणून उंदराने टोपली कुरतडायला सुरुवात केली.आणि पाहता पाहता त्याने त्या टोपीला एक बिळ पाडले. आतील साप सावध झाला. त्या सापाला समजले की काहीतरी गडबड चालू आहे.
टोपली कुरतडून उंदीर आत जाता क्षणीच सापाने डाव साधला आणि एकाच घासात उंदराला खाऊन टाकले. उंदीर आपले प्राण गमावून बसला. विचार न करता केलेली कृती जास्त महागात पडते त्यामुळे जास्त घाई गडबड करून चालत नाही कोणत्याही गोष्टीचा पूर्णपणे विचार केल्याशिवाय एखादी कृती करू नये.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment