उचापती माकड
एकदा एका व्यापार्याने एका पवित्र ठिकाणी छान असे मंदिर बांधण्याचे ठरवले. ते मंदिर बांधण्यासाठी खूप मोठे मोठे कोंडके तिथे आणून ठेवलेले होते. ते ओंडके कापण्यासाठी बरेच सुतार पण तेथे काम करत होते. ते सुतार रोज तिथे येत असत. ते ओंडके मापात कापून ठेवत असे.
तिथे जवळच झाडावर खूप माकड राहत होती. माकडे देखील रोज त्या सुतारांचे काम पहात होते. परंतु माकडे फारच उद्योगी होते. एके दिवशी सुतार अर्धवट लाकूड कापून जेवायला जाण्यासाठी निघाले. जेवायला जाण्याआधी त्यांनी त्या लाकडातील करवत बाजूला काढून तिथे एक पाचर बसवली आणि ते जेवायला निघून गेले. ते जेवायला व जरा आराम करायला म्हणून नदीच्या बाजूला निघून गेले.
तिथे काही उद्योगी माकड आली. त्या माकडांनी सुतारांना काम करताना पाहिलं होतं. ती माकडे देखील त्या सुतराप्रमाने लाकूड कापण्याचे काम करू लागले; त्यासाठी ते करवत चालवू लागले. तेथील समानाला झटापट करू लागले. काही जण उगाचच ओंडक्यावर उभे राहू लागले. एका माकडाने ओंडक्यांच्या मध्ये लावलेली पाचरड काढली. पाचरड काढता क्षणिच ओंडका जुळला व त्यात माकडाची शेपटी अडकली. ते माकड खूप जोराने ओरडू लागले.आराम करता करता कामगार पळतच आले. इतर माकड पळून गेली. एक माकड मात्र शेवटी अडकल्यामुळे तिथेच थांबले. कामगारांनी त्या माकडाला खूप मारले आणि मग त्याची शेपटी सोडवली. ओरडत ओरडत ते माकड झाडावर पळून गेले.
म्हणून ज्याचे काम त्यानेच करावे.उगाचच दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये. एखाद्या कामाची पूर्ण माहिती करून घ्यावी आणि मगच ते काम हाती घ्यावे .
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment