चांदोबाच्या देशात
झाडावर चढू, आकाशात उडू.
ढगांच्या गादीवर, धपकन पडू.
मऊमऊ ढगांवर, घडीभर लोळू.
चमचम चांदण्याशी, लपाछपी खेळू.
पळणाऱ्या चांदोबाच्या, मागे मागे धावू.
चांदण्यांच्या पंगतीला, पोटभर जेवू.
चांदोबाशी गोडीनं, खूप खूप बोलू.
घरातल्या गमती, सांगत चालू.
चालून चालून, दुखतील पाय.
चांदोबा बोलेल, "मला दमलास काय?"
बस माझ्या पाठीवर,
फिरायला जाऊ.
आकाशगंगा जरा,
जवळून पाहू.
चांदोबाच्या पाठीवर,
पटकन बसू.
आकाशात फिरताना,
ताऱ्यांसारखं हसू.
-एकनाथ आव्हाड
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment