महाराष्ट्र दिन
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणून एक मे हा दिवस आपण 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 106 लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारतीय संघराज्यात राज्यांची निर्मिती ही भाषावार प्रांतरचणेनुसार करण्यात आली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेच्या आधारे राज्य निर्मितीची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली.
आपल्या महाराष्ट्रातही मराठी भाषा बोलणारे सर्वाधिक लोक होते. सन 1946 पासून 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' महाराष्ट्रात सुरु झाली. खूप मोठा संघर्ष करून 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
आजच्या दिवशी महाराष्ट्रभर महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment