मुलगी वयात येताना
मीनल! काल, तुमच्या शाळेमध्ये दीक्षित बाईंनी पाळी व्यवस्थापन चर्चासत्र आयोजित केले होते. बाईंचा फोन आला होता. मीनल त्या चर्चासत्राला नव्हती. आई! मला नाही आवडत असल काही. अगं! मीनल, त्यांत नआवडण्या सारखं काय आहे? आज उद्या तू शहाणी होशील? आपल्या शरीराची माहिती आपल्याला नको का?
मीनल: आई मी शहाणी आहे आणि मला माझी चांगली माहिती आहे. असं म्हणत मीनल उड्या मारत निघून गेली. आईने मात्र डोक्याला हात लावला. कसं ह्या मुलीला समजावून सांगावं. काही दिवस गेले. शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा होत्या. मीनलने खो-खो मध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धा सुरू झाल्या.
खेळ रंगात आला होता. मीनल प्रतिस्पर्धीला चकवा देत पळत होती. अचानक तिच्या पोटात कळ आली. काय करावं हे तिला कळेना. ती मटकन खाली बसली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मुली व दीक्षितबाई मीनलच्या जवळ आल्या. दीक्षित बाईंनी मीनलला होत असणारा त्रास ओळखला. मुलीने तिला वाॅशरूमकडे नेले. तिला धीर दिला. मीनलचे कपडे रक्ताने भरलेले होते. किशोरवयीन मुलींसाठी शासनाने विविध चर्चासत्रांचे आयोजन व सॅनिटरी पॅड शाळेतच ठेवण्याचे सूचना दिलेल्या होत्या. बाईंनी मुलींना सॅनिटरी पॅड आणण्यासाठी सांगितले. ते वापरणे विषयी मीनलला सूचना दिल्या. थोड्यावेळात मीनल फ्रेश होऊन आली. दीक्षित बाईंनी प्रेमाने तिला जवळ घेतले. तिला 'मासीक पाळी' विषयी माहिती सांगितली. आता मीनल च्या मनावरील ताण गेला होता. आपल्या शरीरात होणारे बदल तिने ओळखले होते. आई तिला म्हणायची, मीनल आज उद्याचा तू शहाणी होशील.त्याचा अर्थ तिला आज कळला. मुलगी वयात येताना 'मासिक पाळी व्यवस्थापन' विषयी प्रत्येक शाळेतून मुलींना मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक मुलींनी त्या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपल्या शरीरात होणारे बदल जाणुन घेतले पाहिजे. आज जो प्रसंग मीनलवर आला ,तो प्रसंग तुमच्यावरही येईल. मात्र मासिकपाळी विषयी योग्य माहिती तुम्हाला असेल तर मात्र मीनल सारख्या मानसिक त्रासातून तुम्हाला जावे लागणार नाही.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment